आत्मस्पर्श चारीटेबल ट्रस्ट या संस्थेने दोनशे हून अधिक बर्ड फीडर्स दान केले.
नागपूरचा उन्हाळा हा मनुष्य जाती साठीच असहनीय असतो तेव्हा या लहान पशुपक्ष्यांसाठी तो किती पटीने असहनीय राहू शकतो याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आत्मस्पर्श चारीटेबल ट्रस्ट या संस्थेने याची जाण ठेवून मे महिन्यात व तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 200 च्या वर बर्ड फीडर चे वाटप केले.
वाटप करताना त्यासोबत त्याचे महत्त्व सुद्धा पटवून दिले. हिंदू संस्कृती मध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते आणि त्याच आधारावर संस्थेने या प्रकल्पाची लोकप्रियता केली. पक्ष्याचे आपल्या निसर्गामध्ये फार मोठे योगदान असते फळांच्या बिया असोत अथवा फुलांचे परागकण लांब पर्यंत नेण्याचे कसब यांच्यातच असते.
आज लोकांना घरांमध्ये पाळीव प्राणी ठेवायचे फार मोठे वेड आहे अशात रंगीबिरंगी पक्षी, सकाळचा चिवचिवाट, तुमच्या खिडकीमध्ये अथवा गॅलरीमध्ये ऐकवतात आणि तेही रोजच्या चार किंवा पाच रुपयांमध्ये.
पक्ष्यांमुळे निसर्गाचा समतोल तर राखला जातोच पण त्यांच्या सहवासामुळे मानसिक आणि भावनिक ताण तणाव सुद्धा दूर होतात.
येत्या जुलै महिन्यातील वन महोत्सवांमध्ये आत्मस्पर्श चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने 500 झाडे लावायचा मानस आहे आणि आणि त्याकरिता स्वयंसेवक कामास लागले आहेत. असे बरेच समाज उपयोगी प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात आहे.
आमच्या संस्थेच्या www.atmasparsha.org या संकेत स्थळावर आपणास सर्व प्रकल्पाची माहिती मिळेल, अवश्य भेट द्या.
धन्यवाद…
खूप शुभेच्छा आणि आशेने
डॉ.अभिरुची पळसापुरे दिनांक १० जुन २०२3
अध्यक्ष, आत्मास्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर, ठिकाण नागपूर